जगां वेगळ काही तरी.

      जन्माला आल्या पासून ते मरे पर्यंत आपल्या सगळ्यांना  काही तरी जगां वेगळ करायचं अस्त, मग ते काही ही असो पण मनात मात्र एवढीच एक इच्छा असते की काही तरी अस करायचं ज्याने आपल नाव होईल, हे संपूर्ण जग आपल्याला  ओळखेल. ह्या जगात आपली एक नवी ओळख निर्माण होईल . आपण हेच स्वप्न बघत असतो की आज आपल्याला जगा वेगळ काय करता येईल. माणूस हा नेहमी नव्या च्या शोधत असतो, आणि खर म्हंटल तर यात चुकी ही माणसाची मुळीच नाही. कारण देवाने माणसाला जेव्हा या भूमी वर पाठवलं तेव्हा मनुष्य हा प्राणी अतिशय तीक्ष्ण बुद्धिमत्ता असलेला  प्राणी असणार अस वरदान देवानेच माणसाला दिल होत.  

   आजची गोष्ट ही अश्याच एका घटनेशी जुळलेली आहे.  

           सार्थक मध्यम वर्गीय साधं आणि सरळ जीवन जगणारा मुलगा होता, आपल्या ला ही मोठा होऊन आपल्या आई वडलींच नाव मोठ करायचं आहे जगा वेगळ काही तरी नवीन करण्याची इच्छा त्याच्या मनात होती.वडील रिक्षा चालवायचे आणि आई ही घर काम करायची. सार्थक हा एकटाच होता त्याला कुठलं ही दुसरं भावंड किवा बहीण नवती.  तो एकुलता एक असल्याने लाडका ही तेवढच होता, जे माघीतल ते सहज मिळायचं. त्याच्या आई वडिलांनी कधीच त्याला कुठल्याही गोष्टी ची कमतरता होऊ दिली नाही , लहान पणा पासन कुठली गोष्ट मिळाली नाही अस कधी झालं नाही. 

"परस्थिती नवती तरी ही कधीच काही ही कमी पडू दिली नाही, खरच खूप नशीबवान आहे मी मला असे आई बाबा मिळाले",  "सार्थक म्हणाला"

" तुझ बरोबर आहे सार्थक, असे आई बाबा मिळायला खूप नशीब लागत, पण आता १० व्ही ची परीक्षा येते अभ्यास झाला का? घर्याच्यांना खूप अपेक्षा आहेत आपल्या कडण", "काही विचार केला आहेस का की पुढे काय करायचं आहे?"

 " हो हो.. मला माहिती आहे की काय करायचं आहे, आणि हो माझा अभ्यास झाला आहे तर त्याचा नको ताण घेऊ."

आपला प्लॅन झाला आहे, पहिले १० व्ही झाली की मग सायन्स ला एडमिशन घेऊन १२ व्ही काढायची आणि मग व्यवसाय  करायचा, आणि आई बाबा ला कामापासून मोकळा करायचं आणि खूप पैसा कमवायचा. मोठ घर घ्यायचा आई बाबा ला राज्या राणी सारख ठेवायच. बघशील राजू मी एकदिवस खूप मोठा माणूस होणार आणि आई बाबा नी माझ्या साठी जे आज पर्यंत केलं आहे ना त्याची परत फेड करणार. बघशील तू.

"ठीक आहे बघू, पण आता चल उशीर झाला आहे वेळेत घरी नाही गेलो तर आई ओरडेल"

अस म्हणत राजू आणि सार्थक आपल्या आपल्या घरी जाण्या साठी निघाले, त्या दिवशी सार्थक च्या मना मधे वर्तमाना  ऐवजी भविष्याचा विचार जरा जास्त सुरू होता, घर येई पर्यंत आपण मोठं झाल्या वर कुठला व्यवसाय करायचा? त्याचा मॅनेजर कोण असेल? आपल्या कडे किती लोकांना कामाला ठेवायचा? आपला घर कुठे असणार ? किती मजली असणार? ह्या प्रेत्यक  गोष्टीचा विचार सार्थक च्या मनात सुरू होता. विचार करत घरी आलेला सार्थक पाहून, आई ही अचंबित झाली आणि म्हणाली " अरे सार्थक कुठे हरवला आहेस ? एवढा कसला विचार करतोय?" काय झाल? 

" काही नाही ग आई, असाच जरा भविष्याचा विचार करतोय की आजी पासन पुढ्याच्या १० वर्ष्यात मी कुठे असणार? 

" कुठे असणार म्हणजे?, ' एखाद्या चांगल्या कंपनी मधे नोकरी करत असणार. तुझ लग्न झालेल असणार आम्हाला एक छान गोंडस नातू असणार.' " आई हसत म्हणाली"

" छे ग आई, मी आणि नोकरी करणार आणि माझ लग्न झालेला असणार आणि वर्तुन मला एक मूल पण असणार!, ए आई अस काही ही होणार नाही बर का, मी आधीच सांगून ठेवतो मी मोठा होऊन व्यवसाय करणार आणि बाबा ला आणि तुला सांभाळणार. हे लग्न वगैरे मधन कुठून आल ग . हे बघ आई मला ना खूप मोठा माणूस बनायचा आहे ह्या जगात मला माझी एक वेगळी छाप सोडायची आहे, मला तुम्ही ह्या लग्नाच्या बंधनात वगैरे अडकवू नका. 

" अरे हो हो.. सगळं करशील तू., पण पहिले १० व्ही चे पेपर जवळ येत आहेत त्याचा अभ्यास कर आणि चांगल्या नंबर ने पास हो." 

" बस, फक्त पास होऊ का? तुझी काही अपेक्षा नाही का की माझा पहिला नंबर यावा वगैरे ?, 

"  हे बघ,अपेक्षा आहे पण तुला त्या अपेक्षाच्या ओझ्या खाली नाही दाबायच . तुझ्या कडून जेवढं होईल तेवढं कर, आणि तुझ १००% दे, बाकी काही नाही", ' आई म्हणाली '

"अग आई पण प्रत्यक पालकाला वाटत की त्यांच्या मुलाचा पहिला नंबर यावा, मग तू अशी कशी?", ' सार्थक म्हणाला'

" कारण मी दुसऱ्यांची नाही तुझी आई आहे, आणि माझ्या मुला साथी काय योग्य हे मला खूप चांगलं माहिती आहे. नीट अभ्यास करा आणि सोबतच झाल तर आयुष्य जगायला शिक, मान्य आहे की आजच्या जगात पैसा खूप महत्त्वाचा आहे, खूप खूप म्हणजे खूप जास्त, पैश्याने माणूस जे पाहिजे ते घेऊ शकतो पण माणूस कधीच पैश्याने समाधान नाही घेऊ शकत कीव शांति नाही घेऊ शकत. आज काल प्रेत्यक माणसाला वाटतं असत की त्याने स्वथा ची एक वेगळी ओळख बाणवावी, ह्या जगा मधे स्वतः च एक वेगळा स्थान मिळवावं पण हे तर मग सारख च झालं ना, मग यात तू जगा वेगळं काय केलं. खऱ्या अर्थाने जगा वेगळ म्हणजे ज्यात तुझ्या मधे आणि ह्या जगा मधे कुठीलच गोष्टीत साम्य नसणार. ते म्हणजे जगा वेगळं , जी गोष्ट लोक तुला आणि तुझ्या वेगळे पणा ला पाहून करतील ते म्हणजे जगा वेगळं .

परिस्थिती कशी ही आसो बाळा, तुला प्रेत्यक गोष्टीला सामोरी जाता आल पाहिजे. गौतम बुद्धांनी राज पाट सोडून संन्यासी रुप घेतले आणि ज्ञान मिळवला, लोकांना योग्य मार्ग दाखवला.  त्यांच्या ह्या कार्याने त्यांना जगा वेगळं बनवल, आज हजारो लाखो लोक त्यांच्या सिधांतावर चालतात. त्यांना कधीच त्यांच्या निर्णयाचा पश्चाताप झाला नाही कारण त्यांना माहिती होत की त्यांनी निवडलेला मार्ग हा योग्य आहे.  मला जगा वेगळ काही तरी करायचं आहे हे म्हणणं जितक सोप त्या हून ही अवघड ते सत्यात उतरवन. माणसाला त्याच्या निर्णयावर ठाम राहता आल पाहिजे.  तू जगा वेगळं कर पण त्या नादात स्वतः च आयुष्य जगायला नको विसरू, कारण शेवट च्या क्षणी हा पश्चाताप नको की जगा वेगळं करत अस्तानी स्वतः च आयुष्य जगायचं राहून गेलं.

ही गोष्ट कायम लक्ष्यात असू दे.

                       _ वैष्णवी प्रभू सार्वे 

Comments

Popular Posts